( २ )
पुरुषसूक्ताची निर्विकार मनाने छाननी करणे किती अगत्याचे आहे, हे वरील गोष्टींकडे पाहिले तर दिसुन येईल.
हिंदू लोक मोठ्या आग्रहाने सांगतात की, पुरुषसूक्त हे निरुपम आहे. पुरुषसूक्तात निवेदन केलेली समाजरचना ही एक कल्पना आहे. ज्या काळी जगातील अखिल मानवी समाज अगदी मूळच्या वन्य स्थितीत होता व आजच्या सुधारलेल्या जगातील उत्तमोत्तम विचारप्रवाहातील एक थेंबही त्याच्या अंगावर पडलेला नव्हता, तेव्हा पुरुषसूक्तातील समाजरचनेची कल्पना उत्पन्न झाली.
ही कल्पना अद्वितीय अतएव अनुपमेय आहे, असा तिच्याबद्दल दावा करणे म्हणजे निव्वळ थोतांड होय. चातुर्वण्ण्यात निवेदन केलेला समाजरचनेचा आदर्श अनुपमेय आहे व त्या आदर्शाला पुरुषसूक्त उचलून धरते, म्हणून पुरुषसूक्त अनुपमेय होय, अशाप्रकारची मुख्य विचारसरणी 'पुरुषसूक्त अनुपमेय आहे' हे सांगण्यासाठी पुढे मांडण्यात येते. परंतु ही विचारसरणी कितपत टिकू शकते? वर्गविहीन समाज हच आदर्शमय समाज होय, अशी भूमिका पुरुषसूक्ताने घेतली असती तर पुरुषसूक्त अनुपमेय आहे, असे म्हणता आले असते. पण पुरुषसूक्त काय करते? निरनिराळ्या वर्गाचा मिळून एक समाज असावा व असला समाज हाच आदर्शभूत होय, अशी पुरुषसूक्त ची शिकवण आहे. अशाप्रकारच्या सूक्ताला अनुपमेय म्हणावे काय' या प्रश्नाचे अस्तिपक्षी उत्तर फक्त स्वतःला राष्ट्रवादी व देशभक्त म्हणविणारेच दमकतील. अगदी बन्यावस्थेत नसलेल्या प्रत्येक समाजाचीअशी वस्तुस्थिती आहे की, त्याच्यात निरनिराळे वर्ग असणे हे त्या समाजाच्या अस्तित्वाला जरूर आहे साधारणपणे सुधारलेल्या अवस्थेत जे समाज जगात आहेत त्यांची स्थिती अशीच आहे.
या दृष्टीन जगातील सर्व समाजांकडे पाहिले तर असे दिसून येते की, हिंदी-आर्य समाजात वर्ग होते त्यांना मान्यता देऊन निरनिराळ्या वर्गानी मिलन समाज तयार होतो वअसला समाजच आदर्शभूत होय, असे प्रतिपादन करण्यात पुरुषसूक्ताने कोणता अनुपमेयपणा दाखवला आहे?
पुरुषसूक्ताने
जी समाजरचना आदर्शभूत म्हणून सांगितलेली आहे. त्याची अशी काही वैशिष्ट्ये असली
पाहिजेत की, त्या वैशिष्ट्यांमुळे पुरुषसूक्ताला अद्वितीय
समजण्यात येते ती वैशिष्टये कोणती? प्रत्येक
समाज निरनिराळ्या वर्गानी तयार होती. हे वर्ग म्हणजे प्रत्येक समाजाचे मूलग्राही
घटक होत. तरीपण कोणत्याही समाजाने या घटकांचे रूपांतर आपल्या घटनेचे एक कायदेशीर
अंग म्हणून केलेले नाही,
किंवा हे रूपांतरित घटक
समाजरचनेच्या आदर्शाला बळकटी आणणारे आहेत असा दावा कोणत्याही समाजाने मांडलेला
नाही. पुरुषसूक्तात सांगितलेली समाजरचना ही वस्तुस्थितनिदर्शक आहे, पण तिला आदर्शभूत स्वरूप दिलेले आहे आणि हेच पुरुषसूक्तांचे एक
असाधारण वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य असे की, निरनिराळ्या वर्गाचा मिळून समाज तयार होतो, या गोष्टीला कायदेशीरपणा देऊन ती गोष्ट समाजरचनेचा आदर्श म्हणून
मानण्याचे कृत्य कोणत्याही जातीने केलेले नाही, ते पुरुषसूक्ताने केलेले आहे. यासंबंधी ग्रीक लोकांचे उदाहरण देता
येईल. समाज निरनिराळ्या वर्गानी तयार केला पाहिजे व अशाप्रकारचा समाजनिर्मितीचा
मार्ग हाच समाजघटनेचा आदर्श होय, असा
खुद्द प्लेटो याने समाजधारणेबद्दलचा आपला सिद्धांत मांडलेला होता. परंतु या
सिद्धांतास कायद्याचा पाठिंबा देऊन त्याचे असितत्व टिकविण्याचा उपद्व्याप ग्रीक
लोकांनी कधीच केला नाही. पुरुषसूक्त हे जगात एकच असे उदाहरण दिसते की, त्यात समाजरचनेच्या आदर्शाला कायदेशीरपणा आणून तो आदर्श चिरायू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुरुषसूक्ताचे तिसरे वैशिष्ट्य हे की, निरनिराळ्या वर्गाचा मिळून
समाज होतो व हा वर्गमिश्रण समाजरचनेचा आदर्श होय, हे धर्मविहीन तत्त्व होय, असे
कोणत्याही समाजाने मान्य केलेले नाही. फारतर वर्गमिश्रण ही समाजरचनेतील एक साहजिक घटना होय, हे सर्व
समाजांनी मान्य केलेले आहे. पुरुषसूक्ताने याच्याही पुढे आघाडी मारलेली आहे. वर्गमिश्रण हे
समाजरचनेतील एक सहाजिक व आदर्शमय घटना आहे. एवढेच पुरुषसूक्त मानीत नाही, तर वर्गमिश्रण ही परमेश्वरी इच्छेनुरूप झालेली घटना आहे व ती पवित्र
आहे, असे पुरुषसूक्त मानते. पुरुषसूक्ताचे चरम समान.
पुरुष सूक्ताचे चवथे वैशिष्ट असे की, आतापर्यंत
जे समाज होऊन गेले त्या समाजात अशी कधीही ठाम समजुत रुढ झालेली नव्हती की, आपल्यातील
वर्ग एका मर्यादित संख्येतच असावेत. रोमन लोकांत दोन वर्ग होते, इजिप्त च्या लोकांना तीन वर्ग पुरे वाटत होते. हिंदी-इराणी
लोकांमध्येसुद्धा तिनपेक्षा जास्त वर्ग नव्ह्ते.
(Geiger, Civilization of
the Eastern Iranians in Ancient Times,Vol. II.p.64)
(१) आर्थव (पुरोहित), (२) रथेष्टर (क्षत्रिय) आणि (३) वस्त्र्य - पशूयाट (शेतकरी) पुरुषसूक्ताने निवेदिलेली समाजरचना समाजाचे चार वर्ग करते. या कृत्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती धर्मविहित तत्वावर अधिष्ठित झालेली आहे. म्हणजे हे चार वर्ग होणे हे धर्मानुसार होय, असे पुरूषसूक्ताचे म्हणणे आहे, यापेक्षा कमीजास्त अर्थ पुरुषसूक्तातून काढता येत नाही, पुरुषसूक्ताने पाचवे वैशिष्ट्य असे की, निरनिराळ्या परिस्थितीत प्रत्येक समाजात जी घडामोड होत असते तीप्रमाणे प्रत्येक वर्ग इतर वर्गाशी आपले नाते कोणत्या दर्जाचे आहे हे ठरवित असतो व हे ठरविण्यास प्रत्येक समाज वर्गाना मुभा देतो. निरनिराळ्या वर्गासंबंधी आदरभावाची चढती भांजणी आणि तिरस्कारभावाची उतरती भांजणी आपल्यात उत्पन्न करून त्यांना अधिकृत रीतीने पाठिंबा देणे व त्यांना चिरायू करणे ही कृत्ये कोणत्याही समाजाने केलेली नाहीत. पुरुषसूक्त समाजातील निरनिराळ्या वर्गाचा श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा ठरविते. अशाप्रकारे ठरविलेले दर्जे कोणत्याही परिस्थितीला किंवा काळाला येत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पुरुषसूक्त अद्वितीय आहे, असे म्हणावे लागते. निरनिराळे वर्ग एकाच दर्जाचे असू शकत नाहीत, या तत्वाला धरुन ते वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरविलेले आहेत व त्यांच्या दर्जाच्या पायऱ्या उविलेल्या आहेत. या वर्गीकरणाप्रमाणे ब्राह्मणांना सर्व वर्गापेक्षा श्रेष्ठत्व दिलेले आहे. क्षत्रियांचा दर्जा ब्राह्मणांच्या खाली, पण वैश्यांच्या आणि शृद्रांच्या वर, वैश्यांचा दर्जा क्षत्रियांच्या खाली पण शूद्रांच्या वर आणि शूद्रांचा दर्जा इतर सर्व वर्गाच्या खाली.



0 Comments