शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग ३)
मागील भागात सांगितलेल्या प्रकाराचे कायदेकानून शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणांनी तयार केले होते.
त्यांचा सारांश खालीलप्रमाणे देता येईल.
(२) शूद्र हा घाणेरडा असल्यामुळे
त्याला दिसेल किंवा त्याला ऐकू जाईल अशा रीतीने
कोणतेही पवित्र कार्य करू नये.
(३) इतर जातींतील लोकांना ज्या आदराने वागविण्यात येते तसला आदर शूद्रांबद्दल दाखवू नये.
(४) शूद्राचे प्राण म्हणजे क:पदार्थ. शूद्राला कोणीही ठार
मारावे, त्याबद्दल त्याला
कोणी
नुकसानभरपाई मागणार नाही. नुकसानभरपाई देण्याची वेळ आली तर ती इतकी
अल्पशी की, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना ठार मारल्यानंतर जी नुकसानभरपाई
घेण्यात येते तिच्या ती पासंगालाही पुरणार नाही.
(५) शूद्राने ज्ञान
संपादन करू नये. त्याला शिक्षण देणे हे पाप आहे; तसेच तो गुन्हा
होतो.
(६) शूद्राने स्थावरजंगम मालमत्ता जमवू नये. ब्राह्मणाला
इच्छा होईल तेव्हा तो शूद्राची
मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो.
(७) शूद्र कोणत्याही दर्जाचा अधिकारी होऊ शकत नाही.
(८) वरिष्ठ वर्गातील लोकांची सेवाचाकरी करणे हेच शूद्राचे
कर्तव्यकर्म आहे व
त्यामुळेच त्याला मोक्ष मिळतो.
(९) वरिष्ठ जातींतील लोकांनी शूद्रों मिश्र विवाह करू नये.
तथापि शूद्र स्त्रीला रखेली
म्हणून ठेवण्याची मुभा त्यांना आहे. परंतु शूद्राने वरिष्ठ जातीतील स्त्रीच्या
अंगाला
स्पर्श केला तरी तो घोर शिक्षेस पात्र होतो.
(१०) शूद्र गुलामगिरीत जन्मतो व त्याला मरेपर्यंत
गुलामगिरीतच ठेवले पाहिजे.
वरील सारांश विचारात घेतले तर त्यातून दोन मुद्दे प्रामुख्याने लक्षात येतात.
ब्राह्मणांनी स्वतःचे कायदेकानून करण्याचे अधिकार गाजविण्यासाठी शूद्राला निवडून काढलेले आहे, हा एक मुद्दा. फार प्राचीन काळचे ब्राह्मणी वाङ्मय वाचले तर
असे दिसून येईल की, वैश्य यांचा
हिंदी-आर्य समाजात अत्यंत छळ झालेला आहे; शूद्रांचा नव्हे. असे असताही फक्त शूद्रांच्या विरुद्ध ब्रह्मणांनी आपले
अधिकार कायदेकानून करून गाजविले, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. या बाबतीत ऐतरेय ब्राह्मण हा ग्रंथ वाचून पहावा.
विश्वंतारा आणि श्यापर्ण ब्राह्मण यांची कथा या ग्रंथात आहे. यज्ञात सोमरस कोणत्या
वर्गांनी प्यावा, याबद्दलचा खुलासा
या कथेत आहे. वैश्य वर्गाबद्दल सदर कथेत खालील उल्लेख आहे -
"त्यानंतर, पुरोहिताने जर दही आणले तर ते वैश्याचे पेय होय. दह्याने तू वैश्याला संतुष्ट
कर. तुझ्या कुळात वैश्यासारखा माणूस जन्म घेईल. तो दुसऱ्याला मदत करणारा आणि
दुसऱ्याचे भक्ष्य म्हणून राहील. सदर माणसाचा केव्हाही व कोणीही हवा तसा छळ कराव" (Muir, Vol. I, pp. 436-40)
वैश्याबद्दल ब्राह्मणाची इतकी कडक दृष्टी असता त्यांच्याविरुद्ध फारसे
कायदेकानून ब्राह्मणांनी केलेले नाहीत. ब्राह्मणांनी हे काही विरुद्ध कायदेकानून
तयार केलेले आहेत त्यातील जास्त कायदेकानून फक्त शूद्रांच्या विरुद्ध तयार केलेले
आहेत. याचे कारण काय असावे?
ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध जे कायदेकानून तयार केले आणि ब्राह्मणांसाठी
जे सर्वस्वी अनुकूल कायदे तयार केलेले आहेत त्यांची तुलना केली तर त्यांच्या
स्वरूपाचे व हेतूंचे फरक जमीन-अस्मानाचे आहेत, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. शूद्रांच्या विरुद्ध केलेल्या कायदेकानूंची
जंत्री पाहिली तर वरील मुद्दा लक्षात येतो. समाजरचनेतील शूद्रांचा दर्जा
त्रैवर्णिक जातीच्या दर्जाच्या खालचा आहे. एवढेच नव्हे तर हे दोन्ही दर्जे अगदी
विरुद्ध स्वरूपाचे आहेत, असे दाखविण्यात
आलेले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कोणालाही असे वाटेल की, शूद्रांच्या विरुद्ध जे त्रैवर्णिक जातींना हक्क देण्यात
आलेले आहेत ते एका स्वरूपाचे असावेत. परंतु तशी वस्तुस्थिती नाही. खरी वस्तुस्थिती
अशी आहे की, शूद्रांच्या
विरुद्ध क्षत्रिय व वैश्य यांना जे हक्क देण्यात आलेले आहेत ते मामुली स्वरूपाचे
आहेत. परंतु शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणाला जे हक्क व अधिकर देण्यात आलेले आहेत
ते विशेष स्वरूपाचे आहेत. उदाहरणार्थ, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य
यांच्या बाबतीत शूद्रांने एखादा गुन्हा केला तर क्षत्रिय व वैश्य हे ज्या
स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे सांगतील तिच्यापेक्षा अधिक कडक स्वरूपाची
शिक्षा शूद्राला द्यावी, असे ब्राह्मण
सांगेल.
यज्ञयाग करण्यासाठी ब्राह्मणाला शूद्राच्या मालमत्तेची जरुरी भासली तर
ब्राह्मण ती मालमत्ता हवी तेव्हा आपल्या ताब्यात घेऊ शकतो व असे करण्याने
ब्राह्मणाकडून कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा होत नाही. शूद्राने मालमत्ता संपादन
केली तर ती ब्राह्मणाच्या डोळ्यात खुपते; म्हणून शूद्राने मालमत्ता कधीच संपादन करू नये. ज्या देशाचा राजा शूद्र आहे
त्या राज्यात ब्राह्मणाने वस्ती करू नये. शूद्राच्या बाबतीत ब्राह्मणाला इतक्या
तीव्र स्वरूपाचे हक्क व अधिकार का दिलेले आहेत? शूद्र हा आपला जन्माचा वैरी आहे असे समजून वागण्यास ब्राह्मणाला काही विशेष
कारण होते काय?
वर सांगितलेल्या मुद्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे.
शूद्रांसंबंधी अनेक प्रकारचे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकानून धार्मिक ग्रंथांत जे
सांगितलेले आहेत त्याबद्दल सामान्य दर्जाच्या ब्राह्मण गृहस्थाला काय वाटत असावे? हे कायदेकानून करताना ग्रंथकारांनी असामान्य बुद्धिमत्ता
दाखविली आहे. तसेच त्यावेळी त्यांची वृत्ती लज्जास्पद स्वरूपाची होती, हे कोणीही कबूल करील. सामान्य दर्जाचा ब्राह्मण गृहस्थ ही
वस्तुस्थिती मान्य करील काय? शूद्रासंबंधी धर्मग्रंथात जे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकानून सांगितलेले आहेत
त्यांची जंत्री सदर ब्राह्मणांपुढे धरली तर त्याच्या मनात शूद्रांसंबंधी कसलाही
अनुकूल भाव उत्पन्न होणार नाही, हे साहजिक आहे. याचे पहिले कारण असे की, सदर कायदेकानून प्राचीन काळापासून समाजात रूढ झालेले आहेत व परंपरेने त्यांना
समाजात कायमचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. म्हणून या बाबतीत ब्राह्मणांची नैतिक
भावना पूर्णपणे नष्ट झालेली आहे; त्यामुळे हे कायदेकानून नैतिक दृष्टीने बरे आहेत का वाईट आहेत, ते कोणी तयार केले, केव्हा व का केले, असल्या प्रकारचे
प्रश्न त्यांच्या मनात कधीच उद्भवणार नाहीत. दुसरे कारण असे की, शूद्रासंबंधीजे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकानून धर्मग्रंथांत
सांगितलेले आहेत, त्याबद्दलची जाणीव
ज्या ब्राह्मणांना आहे ते असे म्हणतात की, अशा स्वरूपाच्या कायदेकानूबद्दल आपणाला विशेष काय वाटावे किंवा त्यात लाज
बाळगण्यासारखे तरी काय आहे? ब्राह्मणांमधील ही
मनोवृत्ती किती दांभिक आहे, हे स्पष्ट करून
दाखविणे जरूर आहे.
स्वतःची अब्रू आणि सदसद्विवेकबुद्धी यांची बाजू सावरून धरण्यासाठीच ब्राह्मण
लोक वर सांगितलेली मनोवृत्ती दाखवितात. एरव्ही ती मनोवृत्ती कुचकामाची आहे. परंतु
या मनोवृत्तीचा समाचार घेणे जरूर आहे. शूद्रासंबंधी जे कायदेकानून अस्तित्वात आहेत
तशा स्वरूपाचे कायदेकानून जगातील कोणत्याही भागात अस्तित्वात नाहीत, हे स्पष्ट करून सांगणे अत्यंत जरूर आहे. हक्क आणि अपात्रता
यांच्या बाबतीत ब्राह्मणांनी तयार केलेले कायदेकानून आणि जगातील इतर देशांत चालू
असलेले कायदेकानू यांची तुलना करणे शक्य नाही. ब्राह्मणी
कायदेकानून आणि रोमन कायदेकानून याची तुलना केली तर वरील विधानाची सत्यता पटून
येईल.
रोमन कायदेकानूंनच्या अन्वये कोणत्या वर्गाला हक्क प्रदर्शक अधिकार व कोणत्या
वर्गाला अपात्रतादर्शक अधिकार देण्यात आले होते. याबद्दल प्रथमतः तुलनात्मक
दृष्टीने विचार करू या.रोमन कायदेपंडितांनी मनुष्यांचे पाच वर्ग केलेले होते- (१)
अमीर उमराव आणि सामान्य लोक, (२) स्वतंत्र लोक व गुलाम लोक, (३) नागरिक लोक आणि परदेशी लोक, (४) जन्मतःच हक्क मिळविणारे लोक आणि जन्मानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे
लोक आणि (4) ख्रिस्ती लोक आणि
धर्महीन लोक,
रोमन कायदेकानूप्रमाणे पुढील लोकांना अधिकार देण्यात आलेले आहे
(१) अमीर उमराव, (२) स्वतंत्र लोक, (३) नागरिक, (४) जन्मतः हक्क मिळविणारे लोक आणि (५) ख्रिस्ती लोक. रोमन
कायदेकानूनप्रमाणे पुढील लोकांना अपात्रतादर्शक अधिकार देण्यात आले होते-(१)
सामान्य लोक, (२) गुलाम लोक, (३) परदेशी लोक, (४) जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळविणारे लोक, आणि (५) धर्महीन लोक,
रोमन कायदेकानून प्रमाणे जो स्वतंत्र माणूस नागरिक समजला जात होता त्याला
नागरिक व राजकीय हक्क होते. नागरिक हक्कापासून विवाह आणि व्यापार करण्याचे हक्क
मिळत असत. विवाह करण्याचे जे हक्क असत त्यामुळे नागरिक कायदेशीर विवाह करीत असत.
असे विवाह केलेल्या नागरिकाला पितृत्वाचे अधिकार मिळत. मृत्युपत्र न करता जो
मेलेला असतो अशा नातलगाची स्थावरजंगम मिळकत विवाहित नागरिकाला मिळत असे. रोमन
कायद्याप्रमाणे व्यापार करण्याचे जे मार्ग होते ते सर्व नागरिकाला मोकळे होते.
निवडणुकीत मतदान करणे आणि एखाद्या अधिकार गाजविण्याच्या जागेचा स्वीकार करणे, असले हक्क रोमन नागरिकाला राजकीय हक्क म्हणून उपभोगता येत
असत,
गुलाम हा आपल्या धन्याची मालमत्ता म्हणून समजला जाई. त्याला कोणत्याही
प्रकारचे हक्क उपभोगण्याची शक्यता नव्हती. स्वतंत्र माणूस व गुलाम यांच्या
दर्जात जी तफावत आहे ती अतुलनीय आहे..
परदेशी लोकांना नगरिकत्वाचे हक्क नव्हते म्हणून त्यांना राजकीय किंवा नागरिक
हक्क नव्हते. एखादा नागरिक एखाद्या परदेशी माणसाचा पालक असला तर त्या परदेशी
माणसाला कायद्याची मदत व संरक्षण मिळू शकत असे.
जन्मल्यानंतर काही मार्गानी हक्क मिळविणारे जे लोक असतात त्यांचा पालक कोणीतरी
असतो. या वर्गात (१) गुलाम, (२) मुले, (३) पत्नी, (४) कोर्टने धनकोच्या स्वाधीन केलेला ऋणको आणि (५) भाडोत्री पेहेलवान यांचा
समावेश होतो. या लोकांना (१) स्वतंत्रपणे राहता येत नसे, (२) दुसऱ्याची मालमत्ता मिळू शकत नसे व (३) त्यांच्यावर कोणी
अन्याय केला किंवा त्यांना कोणी इजा केली तर त्याबद्दल स्वतंत्रपणे त्यांना त्याची
दाद लावून घेता येत नसे.
पहिल्यांदा रोमन लोक धर्महीन होते. धार्मिक भेदामुळे कोणाला कमी व कोणाला अधिक
धार्मिक भावनेच्या कसोटीवर सामाजिक अधिकार व हक्क वाटण्यात आले. जे ख्रिस्ती धर्म
पाळू लागले त्यांना हे अधिकार व हक्क देण्यात आले. खिस्ती बादशहांच्या कारकीर्दीत
धर्महीन म्हणून जे बडे, निरनिराळ्या पंथाचे
लोक होते. त्यातील लोकांवर आणि ज्यू लोकांवर अत्यंत त्रासदायक नियंत्रणे लादण्यात
आली. त्यांना वारसा हक्क देण्यात आला नव्हता, तसेच त्यांना (कोर्टात) न्यायालयात साक्षीदार होऊ देत नसत. जे जुन्या मताचे
आणि अत्यंत सोवळे खिस्ती होते त्यांनाच सामाजिक हक्कांचा संपूर्ण पणे उपभोग घेता
येत असे.
रोमन कायदेकानूनखाली जे अधिकार व हक्क देण्यात आले होते व अपात्रतादर्शक बंधने
निरनिराळ्या लोकांवर लादण्यात आली होती त्यांची थोडीशी माहिती वर दिली आहे, ती लक्षात घेऊन हिंदू लोक असे म्हणतील की, हिंदू धर्मग्रंथात जे अधिकार व हक्क तसेच अपात्रतादर्शक
अधिकार सांगण्यात आलेले आहेत त्यांना जगातील इतर देशांत जोड मिळते व रोमन लोकांचे
उदाहरण लक्षात घेता हिंदूंचे वरील विधान खरे वाटू लागते. परंतु हिंदू धर्मग्रंथांत
सांगितलेली अपात्रतादर्शक बंधने रोमन
कायद्याने सांगितलेल्या अपत्रतादर्शक बंधनांपेक्षा अधिक घोर, निर्दय स्वरूपाची आहेत, ही बाब हिंदूंना कबूल करावी लागेल.
अपात्रतादर्शक बंधने लादणाऱ्या रोमन कायद्यांची उभारणी काही तत्त्वांवर केलेली
आहे.
त्याचप्रमाणे अपात्रतादर्शक बंधने लादणाऱ्या हिंदू धर्मग्रंथातील कायद्यांची
उभारणी काही तत्वांवर केलेली आहे. या तत्वांची परस्परांशी तुलना केली तर हिंदू
धर्मग्रंथातील उपरोक्त तत्त्वे अत्यंत हीन दर्जाची आहेत, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. रोमन कायद्यान्वये जे
पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने सांगण्यात आलेली आहेत ती कोणत्या पायावर
उभारलेली आहेत? रोमन कायद्याचा
ज्याने वरवर अभ्यास केलेला आहे असा एखादा माणूस सांगू शकेल की, पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने यांचा पाया (१)
मनुष्याचा सामाजिक दर्जा आणि (२) मनुष्याचा कायद्याच्या दृष्टीने असणारा नावलौकिक
यावर अवलंबून होता. रोमन कायद्यान्वये मनुष्याचा सामाजिक दर्जा स्वतंत्रता, नागरिकपणा आणि कुटुंबसंबंध या तीन गोष्टींवर अवलंबून असे.
स्वतंत्रता या वर्गात स्वतंत्र लोक येत, गुलाम येत नसत. स्वतंत्र माणूस जर रोमन नागरिक असेल तर तो सामाजिक दर्जाचे
हक्क भोगू शकत असे. कुटुंबसंबंधी या वर्गात काही विशेष दर्जाची कुटुंबे असतात, त्या कुटुंबातील लोकांना काही विशेष प्रकारचे हक्क असत. जो
नागरिक या कुटुंबापैकी असे त्याला त्या कुटुंबाचे सर्व हक्क उपभोगता येत असत.
एखाद्या रोमन गृहस्थाचा सामाजिक दर्जा काही कारणामुळे कमी होत असे, किंवा संपूर्ण नष्ट होत असे. त्याला जर युद्धात कैदी म्हणून
पकडून नेले किंवा त्याच्यावर गुलामगिरी लादली गेली तर त्याचे स्वातंत्र्य, नागरिकत्व आणि कुटुंबबंधन ही संपूर्णपणे नष्ट होत असे परंतु
तो शत्रूच्या सुटकेतून सुटून परत आला तर त्याला त्याचे स्वातंत्र्य, नागरिकत्व आणि कुटुंबसंबंध ही तिन्ही पुनः परत देण्यात येत
असत,
एखाद्या नागरिकाने स्वतःवर दुसऱ्या राज्याचे नियंत्रण कबूल केले तर त्याचे
नागरिकत्व आणि कुटुंबसंबंध याबद्दलचे हक्क नष्ट होत असत; त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहात असे. अशा
परिस्थितीत त्याला इतर नागरिकांबरोबर सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू देत नसत किंवा
त्याला कोणी विस्तव देत नसत. त्याच्यावर असला बहिष्कार घालण्याचा हेतू हा की, त्याने रोमन राज्याच्या बाहेर जाऊन रहावे. तो स्वतः रोमन
राज्याच्या बाहेर निघून गेला नाही तर त्याला रोमन साम्राज्याबाहेर हद्पार करण्यात
येत असे. एखाद्या माणसाचे कुटुंबसंबंध नष्ट झाले तर त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य व
नागरिकत्व यांना काही बाधा येत नसे. उदाहरणार्थ, एखादा माणूस दुसऱ्या गृहस्थाच्या पालकत्वाखाली गेला किंवा
एखाद्या गृहस्थाने आपल्या मुलाचे पालकत्व सोडले तर त्या माणसाचे किंवा मुलाचे
वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व नष्ट होत नसत.
नागरिकत्व हे प्रथम जन्मावरून मिळत असे. एखाद्या गृहस्थाने कायदेशीर लग्न केले
व त्याची पत्नी गरोदर झाली, आणि तेव्हा ते जर
नागरिक असेल, त्याच्या पत्नीला
जर मुलगा झाला तर त्याला त्याच्या बापाचे नागरिकत्व प्राप्त होत असे. बेकायदेशीर
लग्न झालेल्या जोडप्याला जर मूल झाले तर त्या मुलाला त्याच्या आईचे हक्क प्राप्त
होत असत. एखाद्या रोमन नागरिकाच्या गुलामाला काही विशिष्ट विधी करून नागरिकत्व देता येत
असे. हा नियम पुढे बदलण्यात आला. या बदललेल्या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त
केलेला गुलाम काही विधी केल्यानंतर संपूर्णपणे नागरिक होत नसे, तर त्याला परदेशी माणसाचा दर्जा प्राप्त होत असे. जसनियन
बादशहाने उपरिनिर्दिष्ट बदललेला नियम नषट केला. त्याने पूर्वीचा नियम चालू केला.
या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम रोमन नागरिकत्वाचे सर्व हक्क
उपभोगू शकत असे. नागरिकत्वाचे हक्क बहुधा मेहरबानी - खातर देण्यात येत असत. एखादी
व्यक्ती किंवा सबंध जात यांना असले हक्क देण्याचा ठराव रोमन लोकांची सार्वजनिक सभा
किंवा कायदेमंडळ अथवा रोमन बादशहा मंजूर करीत असत. नागरिकत्वाचे हक्क देण्याची
पद्धत आणि अलीकडची परदेशी माणसांना नागरिकत्व देण्याची पद्धत या सारख्या
स्वरूपाच्या होत.
शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग ४) लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

0 Comments