पुरुषसूक्त हे अद्वितीय का समजावे, याबद्दलची जी वर कारणे सांगितलेली आहेत. तीच खरी कारणे धरली पाहिजेत. परंतु पुरुषसूक्त फक्त अद्वितीय आहे असे नव्हे, ते असमान्यही आहे. त्याच्यातून इतके कूट प्रश्न उत्पन्न होतात की सांगता सोय नाही. म्हणूनच त्याला असामान्य म्हणायचे. पुरुषसूक्तातून कोणते कूटपश्न उत्पन्न होतात याबद्दलची माहिती बहुतेकांना नाही. परंतु हे कूटप्रश्न कोणते आहेत, याबद्दलची माहिती करून घेण्याचा कोणती प्रयत्न केला तर त्या कूटप्रश्नांत खरा जिवंतपणा आणि मनाला थक्क करून सोडणारा संमिश्रपणा किती ओतप्रोत भरलेला आहे, याचा त्याला प्रत्यय येईल.
पुरुषसूक्त जो विश्वोत्पत्तीसंबंधीचा सिद्धांत मांडलेला आहे तो तेवढा एकच सिद्धांत ऋग्वेदात आहे, असे नाही. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळाच्या ७२ व्या ऋचेत विश्वोत्पत्तीसंबंधीचा दुसरा एक सिद्धांत निवेदन केलेला आहे.
(Wilson's Rig Veda, Vol.VI.p. 129)
तो असा --
(१) आपण स्पष्ट आवाजात देवदेवतांची स्तुतिस्तोत्रे गाऊया. स्तुतिस्तोत्रे गायल्यानंतर देवदेवता आपणावर संतुष्ट होतील.
(२) लोहार आपला भाता जसा हवेने भरतो, तसा ब्राह्मणस्पतीने आपल्या श्वासोच्छ्वासाने देवदेवतांच्या पिढ्या भरून टाकल्या.
(३) देवदेवतांच्या पहिल्या युगात सजीवांचा निर्जीवांतून जन्म झाला. त्यानंतर दिशांचा जन्म झाला, आणि त्याच्यानंतर झाडांचा जन्म झला.
(४) पृथ्वीचा जन्म झाडांपासून झाला, दिशांचा जन्म पृथ्वीपासून झाला, दक्षाचा जन्म अदितीपासून झाला अणि त्यानंतर अदितीचा जन्म दक्षापासून झाला.
(५) हे दक्षा! तुझी कन्या अदिती, तिचा जन्म झाला, तिच्या नंतर देवाचा जन्म झाला. ते देव पूजनीय व मृत्यूपासून सुटका झालेले होते.
(६) हे देवांनो! तुम्ही या उत्तम त-हेने शृंगारलेल्या जलाशयात राहता. तुम्ही नृत्य करीत असता तुमच्या (पाया) पासून तिखट धूळ दूर उडून गेली.
(७) हे देवांनो! ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीला पावसाने व्यापून टाकतात, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या अंगकांतीने विश्वे भरून टाकली. तेव्हा तुम्ही महासागरात दडून बसलेला सूर्याला वर काढून आणले.
(८) अदितीला आठ मुलगे झाले. सात पुत्रांना घेऊन ती देवांकडे गेली. मार्तंडाला तिने पुढील उंच डोंगरावर पाठविले.
(९) सात मुलगे घेऊन अदिती पूर्वीच्या पिढीकडे गेली. परंतु तिने मार्तडाला जो जन्म दिला तो जननमरणाच्या बंधनात तो मनुष्याप्रमाणे राहावा म्हणून. जन्म दिला तो जन्म मरणाच्या बंधनात तो मनुष्याप्रमाणे राहावा म्हणून.
विश्वोत्पत्तीसंबंधीचे जे दोन सिद्धांत आहेत ते त्त्वच्या तपशीलाच्या दुष्टीने परस्परांपासून भिन्न आहेत. निर्जीवातून सजीवांची उत्पत्ती झाली, असा एक सिद्धांत विश्वोत्पत्तीसंबंधी प्रतिपादन करतो आणि विश्वोत्पत्ती पुरुषापासून झाली असे दुसरा सिद्धांत प्रतिपादन करतो..
ऋग्वेदात अशा प्रकारचे विश्वोत्पत्तीसंबंधीचे परस्परभिन्न दोन सिद्धांत का प्रतिपादन करण्यात यावेत? पुरुष हा आदि मूळ जनक होय व त्यापासून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती झाली, अशी विचारसरणी मांडायची पुरुषसूक्ताच्या कत्याला आवश्यक का वाटले असावे?
पुरुषसूक्त वाचणाऱ्याला हे दिसून येईल की, गाढव, घोडे, बोकडे इत्यादींची उत्पत्ती कशी झाली, याबद्दलचा पहिल्यांदा त्यात उल्लेख केलेला आहे. सूक्ताच्या प्रारंभी मनुष्याच्या उत्पत्तीसंबंधी काही उल्लेख केलेला नाही, असेही त्याला आढळून येईल. निरनिराळ्या वस्तूंच्या व प्राण्यांच्या उत्पत्तीसंबंधी निवेदन करीत असता मनुष्यजातीच्या उत्पत्तीसंबंधीचा उल्लेख सूक्तात येणे क्रमप्राप्त होते. परंतु केवळ हा मुद्दा स्पष्ट करण्याची पाळी आली असताच सूक्तकाराने उत्पत्तीसंबंधीचे आपले निवेदन मध्येच सोडून दिले व एकदम पुढे उडी मारून आर्य समाजातील निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली, हे निवेदन करण्यास सुरुवात केली. आर्य समाजात चार वर्ग कसे उत्पन्न झाले, याबद्दल स्पष्टीकरण करणे, हच खरोखर आपले आद्य कर्तव्य होय, असेच सूक्तकाराला वाटले असावे. पुरुषसूक्ताचा इतिहास अशाप्रकारचा असल्यामुळे सूक्त विश्वोत्तपत्तीच्या इतर सिद्धांतापासून व ऋग्वेदातील इतर भागांपासून काहीसे निराळ्या स्वरूपाचे आहे, हे खचित.
विश्वोत्पत्तीसंबंधी जे जे सिद्धांत अस्तित्वात आहेत यांपैकी एकाही सिद्धांताने समाजातील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले, हे दाखवून देणे हेच आपले कर्तव्य आहे, असे मानले नाही. पुरुषसूक्ताचे जे ध्येय व कार्य आहे, जवळ जवळ तेच ध्येय व कार्य बायबलच्या जुन्या कारारातील विश्वोत्पत्तीसंबंधीच्या पहिल्या अध्यायाचे आहे. या अध्यायात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन करण्यापलीकडे फारसा मजकून नाही, सामाजिक दर्जाने विभागलेले वर्ग जगातील समाजात अस्तित्वात होते. जुन्या ज्यू लोकांच्या समाजातही असले वर्ग अस्तित्वात होते. हिंदी-आर्य समाज या बाबतीत अपवाद नव्हता. तथापि विश्वोत्पत्तीसंबंधीच्या एकाही सिद्धांताला समाजात वर्ग कसे उत्पन्न होतात याचा खुलासा करण्याची गरज वाटली नाही. तर मग सामाजिक वर्गाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे, असे पुरुषसूक्तकाराला का वाटले बरे?
विश्वोत्पत्तीसंबंधाचे स्पष्टीकरण करणारे पुरुष सूक्त हा ऋग्वेदातील या विषयासंबंधीचा एकुलता एक भाग नाही. ऋग्वेदातील इतर भागातही हा विषय हाताळलेला आहे. यासंबंधी ऋग्वेदातील इतर पुढील भाग पहा. (Muir, Vol. I, p. 180)
ऋग्वेद, १-९६-२ : प्रारंभीची निविद् यापासून व आयूचे बुद्धिचातुर्य यापासून अनीने मनुष्यांची मुले उत्पन्न केली; स्वतःच्या चकचकीत प्रकाशाने अग्नीने पृथ्वी आणि पाणी ही उत्पन्न केली; संपत्ती देणाऱ्या अग्नीला देवांनी वाढविले."
ऋग्वेदकाळात हिंदी-आर्य समाजात निरनिराळे वर्ग उत्पन्न झालेले होते, याबद्दल काही शंका नाही. तरीपण वरील ऋचांत निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा उल्लेख आढळत नाही. एवढेच नवहे तर, ऋग्वेदातील उपरिनिर्दिष्ट ऋचा हिंदी-आर्य समाजातील वर्गाच्या अस्तित्वाबद्दल कानाडोळा करते. परंतु ती ऋचा मनुष्यांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल खुलासा करते. एक पाऊल पुढे जाऊन निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल खुलासा करण्याची गरज सूक्तकाराला का वाटली?
पुरुषसूक्त दुसऱ्या एका बाबतीत ऋग्वेदातील मताविरुद्ध मत प्रदर्शित करते. हिंदी आर्य लोकांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल ऋग्वेदाने एक धर्मभावनाविरहित सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. तो खालील संदर्भावरून कळून येईल -
(१) ऋग्वेद, १-८०-१६ : “अथर्वन, जनकमनू आणि दध्यंच यांनी जो समारंभ केला, त्यात आणि इंद्रांत पूर्वी प्रार्थना व स्तोत्रे सामाविलेली होती." (Muir, Vol. I. p.162)
(२) ऋग्वेद १-११४-२ : “यज्ञ करून जनकमनूने जे वैभव किंवा परमेश्वरी आधार ही मिळविली, ती सर्व, हे रुद्रा! आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाने मिळोत!" (Muir, Vol. I. p.163)
(३) ऋग्वेद, २-३३-१३ : "हे मरुदेवांनो! तुमची लोकांना उपकारक होणारी पवित्र कर्मसाधने, हे सर्व शक्तिमान देवांनो! सर्वात जास्त मंगलमय, हितकारक आणि ज्यांचा आमचा जनकमनू याचे स्वीकार केला ती आणि रुद्राचा आशीर्वाद व सहाय्य यांची मी इच्छा करतो." (Muir, Vol. I. p. 163)
(४) ऋग्वेद,८-५२-१ : "प्राचीन काळचा मित्र सर्वशक्तिमान् देवाच्या सामान यक्त झालेला आहे. देवांच्या सान्निध्यात प्रवेश मिळविण्याचे साधन म्हणून जनकमन यांनी त्या मित्रासंबंधी स्तोत्रे रचिली आहे." (Muir, Vol. I, p. 163)
(५) ऋग्वेद, ३-३-६ : "अग्नीने देव आणि मनुष्यांची मुले यांच्यासह स्तोत्रे गाऊन अनेक प्रकारचे यज्ञ केले." (Muir, Vol. I, p. 165)
(६) ऋग्वेद, ४-३७-१ : "हे देवांनो! वजांनो! आण रिभुक्षण हो! ज्या मार्गानी देव आमच्या यज्ञांकडे आले, त्याच मार्गानी तुम्हीही आमच्या यज्ञांकडे या. हे आनंददायक देवतांनो! जेवढे म्हणून मंगलमय दिवस आहेत त्या दिवशी मनुष्यांच्या लोकांनी यज्ञ करावेत अशी प्रथा पाडा." (Muir, Vol. I, p. 165)
(७) ऋग्वेद, ६-१४-२ : “मनुष्य यांचे लोक आशीर्वाद देणारा अग्नी यांची यज्ञात प्रार्थनामय प्रशंसा करतात." (Muir, Vol. I, p. 165)
ऋग्वेदातील ऋचा ज्य ऋषींनी रचिल्या त्यांनी मनू हा हिंदी आर्य समाजाचा आदिपुरुष होय, ही भावना आपल्या हृदयाशी कवटाळलेली होती, हे ऋग्वेदांतील जे संदर्भ वर उद्धृत केलेले आहेत, त्यावरून दिसून येईल. मनू हाही हिंदी-आर्य समाजाचा मूळ पुरुष होय. या सिद्धांताची पाळेमुळे इतकी खोल रूजलेली होती की, ब्राह्मण व पुराणे यांनीही त्या सिद्धाताला आपापल्या काळात उचलून धरले. ऐतरेय ब्राह्मण (Muir, Vol. I, p. 108) विष्णु पुराण आपापल्या काळात उचलून धरले. ऐतरेय ब्राह्मण (Muir, Vol. I, p. 108) विष्णू पुराण (Muir, Vol.I, pp. 105-107), आणि मत्स्य (Muir, Vol. I, pp. 110-112), यामध्ये या सिद्धांताचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनूचा जनक ब्रह्मा होय, अशी भूमिका त्या ग्रंथांनी मांडलेली आहे, हे खरे; तरी पण मनू हा मानवजातीचा मूळ पुरुष आहे, हे ऋग्वेदांत मांडलेला सिद्धांत या ग्रंथांनी मान्य केलेला आहे व त्याला त्यांनी उचलून धरलेले आहे. (तपशीलासंबंधी जास्त चौकशी करताना मात्र असे आढळून येते की या ग्रंथात सदर सिद्धांताबद्दल फार घोटाळे उत्पन्न केलेले आहेत. विष्णू पुराण म्हणते की, ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे दोन तुकडे केले. एका तुकड्यातून पुरुषाचे व दुसऱ्यातून स्त्रीचे रूप त्याने धारण केले. त्या स्त्रीला सतरूपा हे नाव दिले. तिने फार दिवस घोर तपश्चर्या करून स्वतःसाठी पती मिळविला. त्याचे नाव मनुस्वयंभू. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येबरोबर शरीरसंबंध केला, याबद्दलचा उल्लेख विष्णू पुराणात नाही, तथापि आपली कन्या सतरूपा हिच्याबरोबर शरीरसंबंध करून ब्रह्मदेवाने मनूला जन्म दिला, बद्दल उल्लेख ऐतरेय ब्राह्मण व मत्स्य पुराण यामध्ये सापडतात. याशिवाय मत्स्य पुराणात असा उल्लेख सापडतो की, मनूने घोर तपश्चर्या करून स्वतःला सुंदर पत्नी मिळविली. तिचे नाव अनंता, रामायणात (Muir, Vol. I, p. 117) असा उल्लेख सापडतो की, मनु पुरुष नसून स्त्री होती. ती दक्ष प्रजापतीची मुलगी व काश्यपाची पत्नी होती. पुरुषसूक्त मनुसंबंधी उल्लेख का करीत नाही ? मनूस्वयंभूला विराज अणि विराजाला आदि म्हणून नावे होती, हे सूक्तकाराला माहीत होते; कारण सूक्ताच्या पाचव्या श्लोकात सूक्तकार म्हणतो की, "विराजो अधि पुरुषः" अशी वस्तुस्थिती असता सूक्तकाराने सूक्तात मन संबंधी काही उल्लेख केलेला नाही , हेच चमत्कारिक दिसते.
ऋग्वेदांत जो विश्वोत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यापलीकडे पुरुषसूक्तांतील सिद्धांताने मजल मारलेली आहे, हा तिसरा मुद्दा होय. समाजाच्या सुख-सोयींसाठी श्रमविभाग करणे जरूर आहे, एवढे आकलन करण्याइतकी संस्कृती वैदिक काळातील आर्यांमध्ये प्रसृत झालेली होती. वैदिक काळातील आर्यामध्ये निरनिराळे लोक निरनिराळे उद्योगधंदे करीत असत. प्रत्येकाने निरनिराळे उद्योगधंदे करणे इष्ट आहे, याची जाणीव आर्यांना होती, हे पुढील संदर्भावरून दिसून येईल -
ऋग्वेद, १-११३ -६ "लोकांनी आपापल्या उद्योग धंद्याला लागावे व स्वतःचे उदरभरण करावे, म्हणून उषा देवीनी लोकांना झोपेतून उठविले आहे. काही लोकांनी उठल्यानंतर सत्ता काबीज करण्यास जावे, काहीनी कीर्ती मिळविण्यास बाहेर पडावे, काहींनी संपत्ती मिळवून आणण्यासाठी जावे आणि काहींनी नोकरी मिळविण्यास जावे.
वरील संदर्भ ऋग्वेदांत मिळतो. पुरुषसूक्त त्याच्याही पुढे मजल मारलेली आहे.ऋग्वेदात मांडलेल्या श्रमविभागाच्या कल्पनेला पुरुषसूक्त उचलून धरले. पण त्यानंतर पुरुषसूक्त त्या कल्पनेला अशी कलाटणी देते की, समाजातील काही लोकांनी एका विशिष्ट प्रकारचे, धंदे आपलेसे करून घ्यावेत व ते त्यांनी पिढ्यान् पिढ्या करीत राहिले पाहिजे, एकदा स्वीकारलेले धंदे सदर लोकांनी आधीमधी कधीही बदलता येणार नाहीत. अशाप्रकारची प्रथा समाजात रूढ करण्याचा विक्षिप्त खटाटोप पुरुषसूक्ताने का केला असावा बरे?
ऋग्वेदात मांडलेला सिद्धांत आणि पुरुषसूक्ताने मांडलेला सिद्धांत यांच्यात आणखी एका मुद्द्यासंबंधी फरक आहे. हिंदी-आर्य समाज तसेच हिंदी आर्य राष्ट्र याबद्दल ऋग्वेदात उल्लेख आढळतात. पाच टोळ्यांच्या जमावाने हे राष्ट्र झालेले होते. पाच टोळ्यांचा मिळून हिंदी-आर्य समाज झालेला होता. या पाच टोळ्या परस्परात कशा मिसळलेल्या होत्या व त्यांच्या मिश्रणाने हिंदी-आर्य समाज हा एकच एक समाज म्हणून कसा बळकट झालेला होता , याबद्दलचे उल्लेख खालील ऋचांत सापडतात -
(१) ऋग्वेद, ६-११-४ : "अग्नीच्या पुढे हवन केलेल्या वस्तूंचे ढिगारे पडलेले आहेत. अग्नी हा जणू काही एक माणूस आहे, अशी कल्पना करून पाच टोळ्यांतील लोकांनी त्याच्यापुढे हवन करण्यास आणलेल्या वस्तूंचे ढीग उभे केले व त्याच्यापुढे साष्टांग प्रणिपात करून त्यानी त्याचा सादर सत्कार केला." (Muir, Vol.I, p. 177).
(२) ऋग्वेद, ७-१५-२ - "अग्नी हा शहाणा व तरुण घरमालक झालेला आहे.पाच टोळ्यांतील प्रत्येक घरात त्याने आपले ठाण मांडून घेतलेले आहे." (Muir, Vol.1, p.178)
या पाच टोळ्या कोणत्या त्याबद्दल विद्वान लोकांत काहीसा मतभेद आहे. आपल्या निरुक्तात यास्क म्हणतो की, या पाच टोळ्या महणजे गंधर्व, पितृ, देव, असूर आणि राक्षस हे लोक होत. औपमन्य याच्या मते या पाच टोळ्या म्हणजे चार वर्ण व निषाद लोक हे होत. पाच टोळ्यांसंबंधीचे वरील दोन्ही खुलासे दिशाभूल करणारे आहेत असे दिसते. कारण की, ऋग्वेदातील काही या ऋचांमध्ये पाच टोळ्यांचा सामुदायिक रीतीने प्रशंसापर उल्लेख केलेला आहे' या बाबतीत खालील संदर्भ पहा
(१) ऋग्वेद, २-२-१० - "ज्याच्या बरोबर कोणी तुलना करू शकणार नाही असा स्वर्ग ज्याप्रमाणे दीप्तमान भासतो त्याप्रमाणे आम्हा पाच टोळ्यातील लोकांचे वैभव एकसारखे प्रकाशमान होवो! (Muir, Vol. I, p. 178).
(२) ऋग्वेद, ६-४६-७ - "हे इंद्रा! नहुषाच्या टोळीतील लोकांचा जो जोम व उत्साह आहे तो किंवा पाच टोळ्यांतील लोकांचे जे काही वैभव आहे, ते आम्हाला दे."(Muir, Vol. I, p. 180).
पाच टोळ्यांच्यात शूद्रांचा जर समावेश असता तर या टोळ्यांबद्दल इतकी प्रशंसा ऋग्वेदात कमी नसती. याशिवाय दुसरे कारण असे की, ऋग्वेदातील उपरिनिर्दिष्ट ऋचात 'जन' हा शब्द वापरलेला आहे 'वर्ण' हा शब्द वापरलेला नाही. 'जन' हा शब्द पाच टोळ्यांना उद्देशून वापरलेला आहे तो शब्द चार वर्ण व निषाद यांना उद्देशून वापरलेला नाही.
ही वस्तुस्थिती ऋग्वेदातील खालील ऋचांवरून सिद्ध होते -
ऋग्वेद, १-१०८-८ : "हे इंद्र व अमीरी! यदू, तुवास, द्रह्य अनु, पुरु या लोकामध्य तुमचा निवास असेल तर तुमी सर्व ठिकाणचे बलशाली वीर घेऊन येथे या व हा आताच तयार केलेला सोमरस प्या." (Muir, Vol. I. p.179) पाच टोळ्यांचे संमिश्रण होऊन त्यातून आर्य समाजाची घटना झाली, हे अथर्ववेदातील (३-२४-२).संदर्भावरून स्पष्ट होत. ता संदर्भ असा -
"हे पाच प्रदेश, मनूपासून या पाच टोळ्या उत्पन्न झाल्या."
मानवी समाजात ऐक्यभाव आप्तसंबंधीची भावना यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तरच ऋग्वेदातील ऋचांचे कर्ते जे ऋषी त्यांनी या पाच टोळ्यांसंबंधी वर सांगितलेल्याप्रमाणे जे उल्लेख केलेले आहेत ते का केले, याचा उलगडा होणे शक्य आहे. या बाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात. पाच टोळ्यांचे संमिश्र एकीकरण झालेले होते ही बाब पुरुषसूक्ताने का मान्य केलेली नाही; आणि त्या टोळ्यांच्या उत्पत्तीसंबंधी शास्त्रीय दृष्टीने स्पष्टीकरण का केलेले नाही? उलट अंशी, पाच टोळ्यांत जे जातीविभाग पडलेले होते त्याच्याबद्दल पुरुषसूक्ताने मान्यता दर्शविली आहे, ती का? राष्ट्रीय भावनेपेक्षा जातीय भावना जास्त महत्त्वाची आहे, असे मत पुरुषसूक्ताने का प्रगट केले?
ऋग्वेदी मांडलेल्या विश्वोत्पत्तीसंबंधीच्या सिद्धांताबरोबर पुरुषसूक्तात मांडलेल्या सिद्धांताची तुलना कोणी करू पाहील तर त्यांच्यापुढे पुरुषसूक्तासंबंधीच वर सांगितलेल्या मासल्याचे काही कूटप्रश्न उभे राहतील. समाजशास्त्राच्या दृष्टीने जर कोणी पुरुषसूक्ताचा छाननी करू लागला तर त्याच्यापुढे पुरुषसूक्ता संबंधी दुसरी कूट प्रश्न उभे राहतील.
एका विशिष्ट प्रकारचा आयुष्याचा दर्जा ध्येय म्हणून पुढे ठेवणे हे चांगले तसेच आवश्यक आहे. असला दर्जा एखाद्या माणसाने किंवा समाजाने पुढे ठेवला नाही तर त्या माणसाचे किंवा समाजाचे जीवन व्यर्थ होय. परंतु हा दर्जा असा असावा की काळ आणि परिस्थिती यांच्यात जसा फेरबदल होत जाईल त्याप्रमाणे तो बदलत गेला पाहिजे. दर्जा हा कायम स्वरूपात कधीही ठरविलेला नसतो. आपल्या दर्जाचा बरेवाईटपणा कितपत आहे हे ठरविण्यास भरपूर वाव मिळाला पाहिजे. जेव्हा एखाद्या गोष्टीवर पावित्र्याचा रंग चोपडलेला नसतो तेव्हाच त्या गोष्टीचा बरेवाईटपणा पहाण्यास माणूस धजतो. एखाद्या गोष्टीला पवित्रपणा चिकटविला की तो कायमचा चिकटतो. चातुर्वर्ण्याच्या पवित्रपणा चिकटवून चातुर्वर्ण्य म्हणजे एक पवित्र घटना, परमेश्वरी इच्छेने घडलेली एक समाज घटना होय, असे पुरुषसूक्ताने चातुर्वर्ण्याचे मंडन केलेले आहे. एका विशिष्ट पद्धतीच्या सामाजिक रचनेला इतका पवित्रपणा, पुरुषसूक्ताने दिलेला आहे की त्या समाजरचनेविरुद्ध कोणी अवाक्षर काढू नये किंवा तीत काडीचाही फेरफार कोणी करू नये. पुरुषसूक्ताने हे कशासाठी केले? समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे पुरुषसूक्ताबाबतचा हा पहिला कूटप्रश्न उभा राहतो..
चातुर्वर्ण्याच्या सिद्धांत प्रतिपादन करताना पुरुषसूक्त दुहेरी डाव खेळलेले आहे. हिंदी आर्य समाजात जे चार वर्ग अस्तित्वात होते त्यांची त्याने आदर्शमय ठिकाणी स्थापना पहिल्यांदा केली. सूक्ताचे हे कृत्य शुद्ध फसवणुकीचे आहे. कारण चातुर्वर्ण्याबद्दलची वस्तुस्थिती आणि त्याला दिलेले आदर्शवत स्थान यामध्ये फरक नव्हता. चातुर्वर्ण्य बद्दलच्या परिस्थितीला आदर्शमय ठिकाणी ठेवल्यानंतरसुद्धा सूक्ताने त्या आदर्शवत ठिकाणाचे पुनः पुनः गोडवे गायिलेले आहेत. सूक्ताचे हेही कृत्य फसवणुकीचे आहे. कारण चातुर्वण्याला दिलेले आदर्शवत स्थान हे त्याच्याच वस्तुस्थितीच्या अंतर्यामात बसत होते. वस्तुस्थितीला आदर्शमय स्वरूप देणे आणि आदर्शाची प्रचीती घेणे, याबाबतीत सूक्ताने प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न म्हणजे राजकारणात जो भुलभुलावणीचा खेळ खेळला जातो त्याच स्वरूपाचा होय. या प्रयत्नासारखा एखादा प्रयत्न कोणत्याही धार्मिक ग्रंथात आढळणार नाही, याबद्दल माझी खाली आहे. 'ढोंगी व फसवेबाज' या विशेषणाशिवाय या प्रयत्नाला दुसरे कोणते विशेषण देता येईल? वस्तुस्थितीला अशा आदर्शाचा मुलामा देणे हे कृत्य तर अन्यायी आहेच, शिवाय हे अत्यंत स्वार्थसाधूपणाचे आहे. अशा आदर्शाला समाजात रूढ करणे हे मोठे समाजघातकी कृत्य होय. एखादी बाब समाजात एकदा रूढ झाली की ती कायमचीच रूढ झाली पाहिजे अशी भूमिका स्वीकारून ज्या रीतिभाती समाजात असमानता प्रसृत करतात त्या रीतिभातींना अविनाशी स्वरूप देणे, असा य प्रयत्नाचा अर्थ होतो. अशाप्रकारची विचारसरणी नीतिशास्त्रातील कोणत्याही तत्त्वाशी जुळणारी नाही. ज्या समाजात सामाजिक बऱ्यावाईट गोष्टींबद्दल जागृतभाव आहे तो समाज या विचारसरणीला कधीही पाठिंबा देणार नाही. उलट अंशी आपणाला असे दिसून येईल की, जगाच्या आरंभापासून आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि समाज यांच्या सामाजिक व्यवहारात जी काही प्रगती झालेली आहे ती एका नैतिक तत्त्वाच्या शिकवणुकीबरहुकूम झालेली आहे. ते नैतिक तत्त्व म्हणजे जी बाब समाजात चुकीने रूढ केली गेली आहे तिला रूढ म्हणून मान्यता देऊ नये; एवढेच नव्हे तर ती रूढ बाब दूर करून तिच्यात योग्य तो फेरफार करून ती बाब सुधारलेल्या स्वरूपात रूढ केली पाहिजे. वरील विवेचनावरून हे कळून येईल की, पुरुषसूक्त लिहिण्याच्या मागे जे तत्त्व आहे त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाच आहे व त्याचे परिणाम समाजहिताला बाधक आहेत. कारण की, एका वर्गाने बेकायदेशीर व अन्याय्य मार्गाने मिळविलेल्या हितकारक गोष्टीला आणि दुसऱ्या वर्गावर जबरदस्तीने लादलेल्या अहितकारक गोष्टीला चिरायू करणे हे त्या तत्त्वाचे ध्येय आहे. अशाप्रकारचा भूलभुलावणीचा खेळ खेळण्यात पुरुषसूक्ताचा काय हेतू असावा, हा दुसरा कूटप्रश्न होय.
पुरुषसूक्तासंबंधी समाजशास्त्रीय दृष्टीने उहापोह केला तर जे अनेक कूटप्रश्न उपस्थित होतात त्यातील शेवटचा व सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचा एक कूटप्रश्न आहे. पुरुषसूक्तात शूद्रांना जे स्थान दिलेले आहे, त्याबद्दलचा. निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले, याबद्दल स्पष्टीकरणाची मुख्य भूमिका पुरुषसूक्ताने घेतलेली आहे. ते वर्ग परमेश्वराने उत्पन्न केले असे पुरुषसूक्त चे म्हणणे आहे. पुरुषसूक्त ने हा जो सिद्धांत मांडलेला आहे, तसला सिद्धांत कोणतेही ब्रह्मज्ञानविषयक शास्त्र मांडणार नाही. ही बाब बरीचशी आश्चर्यकारक आहे. जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांना निरनिराळ्या वर्गांचे उत्पत्तीस्थान चिकटविण्याचा सूक्ताने जो व्यूह रचला तो तर त्यापेक्षा अधिक आश्चर्य उत्पन्न करणारा आहे. हा व्यूह काही आकस्मिक रीतीने आलेला नाही, तर तो विचारपूर्वक व आस्थेवाईक रीतीने तयार केलेला आहे. दोन गहन प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली तयार करणे, ही त्या व्यूहाच्या पाठीमागची मुख्य कल्पना ठरविणे हा एक आणि मनात योजना तयार केल्याप्रमाण त्या चार वर्गांच्या श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जाच्या पायऱ्या ठरविणे हा दुसरा, असे हे दोन गहन प्रश्न होत. असे करण्यापासून जो फायदा आहे तो असा. जग उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराच्या शरीराचे जे भाग चार वर्गांना दिलेले आहेत ते भाग त्या वर्णांचे सामाजिक दर्जे कायमचे ठरवितात. आणि ते सामाजिक दर्जे त्या त्या वर्णाचे धंदे कायमचे ठरवितात. ब्राह्मण वर्णाच्या उत्पत्तीचे स्थान परमेश्वराच्या मुखाला चिकटविलेले आहे; मुख हे शरीरातील प्रमुख भाग होय. त्यातून उत्पन्न झालेला ब्राह्मण वर्ण हा अर्थातच चार वर्णाहून श्रेष्ठ होतो. ब्राह्मण वर्ण हा चारी वर्णात सर्वश्रेष्ठ म्हणून ज्ञानार्जन व ज्ञानभांडारसंरक्षण हा जो सर्व धंद्यातील सर्वश्रेष्ठ धंदा आहे तो ब्राह्मण वर्गाला दिला. क्षत्रिय वर्णाचे उगमस्थान परमेश्वराच्या बाहूंना चिकटविलेले आहे. बाहू हे शरीराच्या सर्व अंगांमध्ये मुखाच्या खालोखालचे प्रमुख अग होत. म्हणून क्षत्रिय वर्गाला ब्राह्मण वर्गाच्या खालचा दर्जा दिला. (ज्ञानार्जन व ज्ञानदान या धंद्याच्या खालचा महत्त्वाचा धंदा लढण्याचा, तो क्षत्रिय वर्णाला दिला) वैश्य वर्गाचे जन्मस्थान परमेश्वराच्या मांड्यांना चिकटविलेले आहे. मांड्या या बाजूच्या खालच्या महत्त्वाच्या दर्जाच्या होत, म्हणून लढवय्याच्या धंद्यापेक्षा कमी दर्जाचा धंदा जो व्यापार तो वैश्य वणाला दिला. शूद्र वर्णाचे उत्पत्तीस्थान परमेश्वराच्या पायांना चिकटविलेले आहे. पाय हे मानवा शरीरातील अगदी खालच्या दर्जाचे व सौंदर्याच्या दृष्टीने कमी दर्जाचे भाग होत. म्हणून शूद्र वर्णाला सामाजिक दर्जातील अगदी शेवटचा हीन दर्जा दिला आणि सेवाचाकरी करण है। सव धंद्यातील अत्यंत गलिच्छ प्रतीचा धंदा तो त्याला दिला.
चार वर्गांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी पुरुषसूक्ताने ही पद्धत का स्वीकारली? शरीरात जे स्थान पायांचे ते समाजात शूद्रांचे होय. अशा पद्धतीने सूक्ताने शूद्रांच्या उत्पत्तीचा इतिहास का सांगितला? चार वर्ग कसे उत्पन्न झाले, याचा उहापोह पुरुषसूक्ताने निराळ्या पद्धतीने का केला नाही? विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी शास्त्रकारांनी फक्त पुरुषसूक्ताचाच अवलंब केलेला आहे असे नाही. वेदांची उत्पत्ती कशी झाली, याचे स्पष्टीकरण छांदोग्य उपनिषदात जे दिलेले आहे त्याची व सूक्ताने चार वर्गांच्या उत्पत्तीसंबंधी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याची तुलना करून पहा. छांदोग्य उपनिषद (Muir, Vol.I, P.5)म्हणते --
"प्रजापतीने सर्व जगात उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या जगापासून त्याने त्यांची जीवनसत्त्वे बाहेर काढली- उदा. पृथ्वीपासून अग्नी, आकाशपोकळीतून वारा, आकाशातून सूर्य. या तीन देवतांमध्ये प्रजापतीने उष्णता भरली आणि त्यांच्यातून याची जीवनसत्त्वे बाहेर काढली - अग्नीपासून ऋचाचे श्लोक, वाऱ्यापासून यजूचे श्लोक आणि सूर्यापासून सामचे श्लोक. त्यानंतर या तीन शास्त्रांत त्याने उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या त्या तीन शास्त्रांतून त्याने त्यांची जीवनसत्त्वे बाहेर काढली - ऋचा श्लोकामधून 'भू' हे व्यंजन, यजूस श्लोकामधून 'भुवः' आणि सामन् श्लोकातून 'स्वर'.''
निरनिराळ्या देवतांपासून वेदांची उत्पत्ती झाली, याबद्दलचे हे स्पष्टीकरण आहे. देवदेवतांंचा हिंदी-आर्य समाजात दुष्काळ नव्हता. त्यांची एकंदर संख्या तीस कोटी होती. चार देवतांपासून चार वर्ण उत्पन्न झाले, असे जर वर्णांच्या उत्पत्तीबद्दल स्पष्टीकरण केले असत तर सर्व वर्ण जन्मतःच समान दर्जाचे आहेत, या सिद्धांताला त्याची पुष्टी मिळाली असती.चार वर्गांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करताना पुरुषसूक्ताने वर सांगितलेल्या प्रकारच्या स्पष्टीकरण पद्धतीचा अवलंब का केला नाही?
पुरुषाच्या निरनिराळ्या मुखांपासून निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले, असा सिद्धांत मांडणे सूक्तकाराला अशक्य होते काय? पुरुषसूक्त वर्णिलेल्या पुरुष एक हजार डोके होती, म्हणजे त्याला एक हजार मुखे होती. पुरुषाच्या एका मुखातून एक जीवमाणू उत्पन्न झाला, अशी निरनिराळ्या जीवमाणूंच्या उत्पत्तीबद्दल हकिगत देण्यास सूक्तकाराला काहीच अडचण नव्हती; आणि अशा रीतीने विश्वोत्पत्तीबद्दलची हकिगत सांगण्याची कल्पना सूक्तकाराला येणे अशक्य नव्हते. चार वेदांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी विष्णुपुराणाने सदर पद्धतीचा अवलंब केला आहे. याबद्दलचा संदर्भ (Muir, Vol. III, p. II) खालीलप्रमाणे आहे --
"ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व बाजूच्या मुखातून गायत्री मंत्र, ऋचांचे श्लोक, त्रिवृत, समरथांतर, यज्ञ आणि अग्निष्टोम यांना जन्म दिला. आपल्या दक्षिण बाजूच्या मुखातून त्याने यजूस श्लोक, त्रिष्टुभ वृत्त, पंचदश स्तोम, बृहत्सामन आणि उख्य यांना जन्म दिला. आपल्या पश्चिम बाजूच्या मुखातून त्याने सामन श्लोक, जगतिवृत्त सप्तदश स्तोम, वैरूप आणि अतिरत्र यांना जन्म दिला. आपल्या उत्तर बाजूच्या मुखातून त्याने एकविश अथर्वण, आप्तीर्यामन अनुष्टुभ आणि विराजवृत्ते यांना जन्म दिला."
वेदांची उत्पत्ती कशी झाली, याचे स्पष्टीकरण हरिवंश निराळ्या रीतीने करतो. स्पष्टीकरण (Muir, Vol. III.p. 13) असे --
"परमेश्वराने आपल्या डोळ्यातून ऋग्वेद आणि यजुर्वेद यांना, आपल्या जिभेच्या टोकापासून सामवेद याला, आणि आपल्या डोक्यापासून अथर्ववेद याला जन्म दिला."
निरनिराळ्या वर्षांची उत्पत्ती कशी झाली व त्यांचे परस्परातील संबंध कशाप्रकारचे होते, याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्तकारालाच परमेश्वराचे शरीर व त्याचे निरनिराळे भाग यांचा उपयोग करावा लागला, याची कारणे काय होती, हे माहीत नाही, परंतु ही कारणे तशीच सबळ होती असे गृहीत धरले तरी एक प्रश्न शिल्लक राहतो. तो हा की, पुरुषाचे निरनिराळे अवयव व निरनिराळे वर्ग यांची सांगड सूक्तकाराने ज्या पद्धतीने घातलेली आहे ती का?
खालील गोष्टी विचारात घेतल्या तर वर सांगितलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आह, हे लक्षात येईल. समाजातील निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्तात परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांचा उपयोग केलेला आहे. ही गोष्ट फक्त पुरुषसूक्ताने केलेली आहे, असे नाही. यज्ञ करण्यासाठी ज्या पुरोहितांची नेमणूक होत त्या पुरोहितांतील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले, त्याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी वैशंपायन ऋषीने त्याच गोष्टीचा अवलंब केलेला आहे. परंतु सूक्तकाराने सांगितलेले स्पष्टीकरण व वैशंपायन ऋषीने त्याच गोष्टीचा अवलंब केलेला आहे. परंतु सूक्तकाराने सांगितलेल स्पष्टीकरण व वैशंपायन ऋषीने सांगितलेले स्पष्टीकरण यामध्ये जमीन अस्माननाचा फरक आहे. वैशंपायनाने सांगितलेले स्पष्टीकरण हरिवंशात (Muir, Vol. I, p. 154-155) दिल आहे, ते असे -
"जगात जलप्रलय झाला. सर्व जग म्हणजे एक महासागर झाला. जगात पसरलेल्या पाण्यावर सर्वशक्तिमान प्रभू हरी नारायण यांनी कटाक्ष फेकून ते आपल्या अंकित केले. त्यावर तो झोपला. पाण्याच्या मध्यभागी तो पडलेला होता व तो स्वतः एखाद्या महासागरा प्रमाणे दिसत होता. तो आपले बलवान हात पसरून निर्विकार मनाने झोपलेला होता. तो अमर आहे असे ब्राह्मण समजतात. तन्मयावस्थेमुळे त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडला. यानंतर भूत, वर्तमान व भविष्य अशा तिन्ही काळांची वस्त्रे अंगावर घेऊन तो प्रभू झोपला. जी जी वस्तू श्रेष्ठतम आहे, ती ती तो पुरुषोतम (विष्णू) होय. पुरुष किंवा जी जी वस्तू पुरुष या नावाने ओळखली जाते ती यज्ञ म्हणून समजावी. यज्ञात अर्घ्य देण्यासाठी ईश्वराने आपल्या शरीरातून पूर्वी ब्राह्मण उत्पन्न केले होते. ते यज्ञकर्म यथाविधी करीत व त्या व्यतिरिक्त दुसरे काही करत नसत. म्हणून त्यांना ऋत्विज हे नाव प्राप्त झाले. ईश्वराने आपल्या मुखातून ब्राह्मण उत्पन्न केला तो सर्वात प्रमुख होय. सामन मंत्र म्हणणारी उद्गात्री हिलाही ईश्वराने आपल्या बाहूपासून निर्माण केले, तसेच होत्री आणि अध्व' हे उत्पन्न केले. त्यानंतर त्याने प्रस्तोत्रीमैत्रवरुण आणि प्रतिष्ठात्री यांना उत्पन्न केले. त्याने आपल्या बेंबीपासून प्रति आणि पात्री, आपल्या मांड्यांपासून अच्छवाक आणि नेष्ट्री, आपल्या हातांपासून अग्निध्रा आणि यज्ञीय ब्राह्मण, आपल्या बहूपासून ग्रावण आणि यज्ञ उन्रेत्रा यांना उत्पन्न केले. याप्रमाणे परममंगल भगवंताने सर्व यज्ञात मंत्र म्हणण्यास लायक असे सर्वोत्कृष्ट सोळा ऋत्विज उत्पन्न केले. म्हणून हा पुरुष यज्ञापासून तयार झालेला आहे व त्याला वेद असे म्हणतात. त्याच्या जीवन-सत्त्वांतून सर्व वेद, वेदांगे, उपनिषदे आणि संस्कार समारंभ उत्पन्न झाले."
एखादा यज्ञ करावयाचा तर त्यासाठी एकंदर सतरा निरनिराळ्या वर्गाच्या पुरोहितांची जरुरी असे. पुरुषाचे अवयव थोडे आणि पुरोहितांची संख्या मोठी यामुळे पुरोहितांच्या उत्पत्तीचे मूळ पुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांना चिकटविता येणे शक्य नव्हते.
परमेश्वराचे अवयव पुष्कळ, त्यामुळे निरनिराळ्या वर्गाचे उत्पत्तीस्थान परमेश्वराच्या एखाद्या अवयवाला चिकटविता आले. पुरुषाच्या पायांपासून सतरापैकी एखाद्या पुरोहित वर्गाचा जन्म झाला, असे पुरुषसूक्तात प्रतिपादन केलेले नाही. याची कारणे वर सांगितलेली आहेत. या बाबतीत वैशंपायनाने काय केले? एकापेक्षा अधिक पुरोहित वर्गाची उत्पत्ती परमेश्वराच्या एखाद्या विवक्षित अवयवापासून झाली, असे निवेदन करण्यास त्याला काही हरकत वाटत नाही. एखाद्या पुरोहि वर्गाची उत्पत्ती पुरुषाच्या पायांपासून झाली, हे सांगण्याचे त्याने मोठ्या शिताफीने टाळलेले आहे.
शूद्राची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना पुरुषसूक्ताने आणि ब्राह्मणांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना हरिवंशाने जी वृत्ती दाखविलेली आहे तीही लक्षात घेतली पाहिजे. हरिवंशाने दाखविलेल्या वृत्तीपेक्षा पुरुषसूक्ताने दाखविलेली वृत्ती अधिक कुत्सिपणाची आहे. शुद्र हे पुरुषाच्या पायापासून जन्मलेले आहेत आणि त्यांनी पिढ्यान् पिढ्या इतर वर्णांची सेवाचाकरी केली पाहिजे, हे पुरुषसूक्ताने जे सांगितलेले आहे ते सूत्रकाराला शूद्रांबद्दल जो तीव्र मत्सर वाटत होता त्यामुळे की काय? असे असेल तर या मत्सराचे कारण काय?
समाजशास्त्रीय दृष्टीने जर पुरुषसूक्ताची बारकाईने छाननी केली तर जे काही त्यातून कूटप्रश्न उपस्थित होतात ते वर सांगितलेले आहेत. चातुर्वर्ण्याची कल्पना पुढील काळात जसजशी वृद्धिंगत होत गेली तसतसे शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधी आणि त्यांच्या एकंदर अवस्थेसंबंधी दुसरे गूढ प्रश्न उपस्थित होत गेले. पुढील काळात या विषयासंबंधी ज्या घडामोडी उत्पन्न झाल्या त्या लक्षात घेतल्या तर चातुर्वर्ण्य उत्पन्न केल्यामुळे समाजाला कोणते परिणाम भोगावे लागले, याची शहानिशा करता येईल. पुढील काळात चातुर्वण्य संबंधी मुख्यतः दोन घडामोडी उत्पन्न झाल्या, शूद्राच्या खालोखाल एक पाचवा वर्ग उत्पन्न करण्यात आला, ही पहिली आणि ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रैवर्णिकांपासून शूद्र वर्णाला अलग ठेवण्यात आले ही दुसरी. पुढील काळात हे जे फेरबद्दल उत्पन्न झाले ते अशा रीतीने की जणू काही त्यांची उत्पत्ती पुरुषसूक्तात सांगितलेल्या समाजरचनेपासून झाला होती, असे वाटते. या परिस्थितीमुळे या फेरबदलातून काही नवे शब्द अस्तित्वात आले व त्या शब्दांचा अर्थ काही विशिष्ट कल्पना प्रदर्शित करणारा होता. या कल्पना पुरुषसूक्तातील समाजरचनेची कल्पना जणू काही जुळ्या बहिणी आहेत असे वाटते."सवर्ण", "अवर्ण", "द्विज", "अद्विज" आणि "त्रैवर्णिक" हे ते शब्द होत. प्रारंभीचे चार वर्ग होते. त्यांच्यात पुढे जे विभाग झाले आणि प्रत्येक विभागात श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे संबंध कोणते आहेत, या गोष्टीच्या कल्पना सदर शब्द सूचित करतात. या वर्गाचे संबंध कोणत्या त-हेचे आहेत, याबद्दल विचार करणे जरूर आहे. कारण या परस्परसंबंधातून एक नवा गूढ प्रश्न उपस्थित होतो. या नवा गूढ प्रश्न लोकांच्या लक्षात आला नाही. उपरिमिदिर शब्द हे काही विभागाची केवळ नावे सूचित करीत नाहीत, तर ते त्या विभागाचे काही विशिष्ट हक्क व सवलती सूचित करतात, हे पहिले कारण, सदर नावावरून ज्या हक्काचा व सवलतींचा बोध होतो तो लक्षात घेऊन सदर नावाखाली जे वर्गाचे विभाग करण्यात आत त विभाग तर्कशुद्ध आहेत काय, हे दुसरे कारण.



0 Comments