दरवळतो गंध मातीचा .

धरती आकाशाचं नातं
ऋणानुबंधाच्या या रेशीमगाठी
ढगांचा साज लेऊन
आतुर झाला भेटीसाठी

मृदगंधाची कुपी सांडते
येता पाऊस धारा
दरवळतो गंध ओल्या मातीचा
मनी नाचतो आठवणींचा वारा

झिम्माड पाऊस असाच 
श्रावणात बरसत आला
प्रत्येकाच्या मनात नवी
स्वप्ने पेरून गेला

- सरिता कलढोणे जुन्नर

Post a Comment

0 Comments