सिंधुताई सपकाळ यांना विनम्र श्रद्धांजलि

 अनाथांना दिलास माई तू आधार 

नाही घेतलीस कधी माघार

राहिलीस तू उपाशी घास भरवलेस लेकराला

वनवन फिरतेस त्यांच्यासाठी

सलाम माय तुझ्या ममतेला

तू अनाथांची माई आई सिंधुताई //१//


घेतलेस अफाट कष्ट मोठे तुझे मन

नाही येऊ दिलीस कधी

अनाथांना आई-बाबाची आठवण 

पायी पायी चाललीस माय तू

खूप संकटावर मात केलीस तू

स्वतः सोसलेस तू माई दुःख

अनाथ मुलांना दिलेस तू सुख 

तू अनाथांची माई आई सिंधुताई //२//


थोर तुझे कार्य माई

अनाथांचा तू आधार तू आई

देव दिसतो तुझ्यात माई

तुझ्या चरणी नतमस्तक आई

तू अनाथांची माई आई सिंधूताई //३/

Post a Comment

0 Comments